संतांची फॅक्टरी


Populus vult decipi – ergo decipiatur.t 
(लोकांना स्वत:ला फसवून घ्यायचे असते, म्हणून ते फसले जातात. एक लॅटिन वचन.) 

कोणत्याही राष्ट्राला जगण्यासाठी उद्योगधंदे वगैरे उभारावेच लागतात. व्हॅटिकन हे जगातील सर्वात लहान राष्ट्र. तेथे असे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे बहुधा त्यांनी तेथे संतांचे कारखाने काढले आहेत. धर्म हे सार्वकालीन चलनी नाणे आहेच. त्यात हे उत्पादन. या जोरावर व्हॅटिकनचा जागतिक संसार छान चालतो. अलीकडच्या काळात व्हॅटिकनचा हा संतनिर्मितीचा उद्योग चांगलाच वाढल्याचा दिसतो. आकडेवारीत सांगायचे, तर १९७८ ला पोपपदी आलेल्या जॉन पॉल दुसरे यांनी तब्बल ४८२ जणांना संतपद बहाल केले. सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी तो विक्रम मोडण्याचा चंग बांधल्याचे दिसते. त्यांनी आल्या आल्या ८१३ जणांना घाऊकपणे संतपदी नेऊन बसविले आणि आता भारतरत्न मदर तेरेसा यांचा संतपदाचा मार्ग मोकळा केला आहे.

Read more...

चला, संशयात्मा होऊया..

‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सातत्याने सांगत राहिलात की हळुहळू लोकांना ती खरी वाटू लागते. लोकांचा त्यावर विश्वास बसतो.’ 
हिटलरचा प्रोपागंडा मंत्री जोसेफ गोबेल्स याचे हे विधान. अनेक ग्रंथांतूनही ते त्याच्या नावावर उद्धृत करण्यात आले आहे. या विधानाची मौज अशी की त्याला हेच विधान तंतोतंत लागू पडते! म्हणजे – गोबेल्सच्या नावावर खपविण्यात येणारे हे विधान त्याचे नाही. मिशिगनमधल्या केविन कॉलेजचे प्रो. रँडल बेटवर्क हे नाझी प्रोपागंडाचे अभ्यासक. त्या विषयावरचे अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या संशोधनाचा हा निष्कर्ष.

अशा अनेक गोष्टी सांगता येतील. उदाहरणार्थ न्यूटन आणि सफरचंदाची गोष्ट.

Read more...

मस्तानीची बदनामी : एक माजघरी कारस्थान!


बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाणे हे इतिहासाला धरून नसल्याने त्याविरोधात गेल्या महिन्यात संतापाची लाट निर्माण झाली. सर्वांचे म्हणणे एकच होते, की इतिहासाचा विपर्यास सहन केला जाणार नाही, करता कामा नये. ही एक चांगलीच गोष्ट झाली. इतिहासाशी वृथा खेळ नको असा आग्रह धरला जाणे ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे. असा आग्रह धरल्यामुळे आणखी एक झाले. ते फारसे कुणाच्या लक्षात आलेले दिसत नाही, पण पुराव्यांनिशी इतिहास जे सांगतो ते आणि तेवढेच मान्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या अंगावर आली.

काशीबाई ही पेशव्यांची पत्नी. तशात ती एका पायाने अधू. त्यात पुन्हा तो काळ. सोवळ्या ओवळ्याचा, पडदागोशाचा. तेव्हा काशीबाई काही अशा नाचणार नाहीत. असे जे म्हटले जाते ते खरेच आहे. पण हे म्हणताना मस्तानीही तशी नाचणार नाही हेही जाणून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. ती पेलायची तर त्याकरीता मस्तानी कोण होती येथून सुरूवात करावी लागणार आहे. त्यासाठी गंभीर साधनांद्वारे इतिहास समजावून घ्यावा लागणार आहे. मनावरील कादंबरीमय इतिहासाची आणि ऐकीव आख्यायिकांची भूल उतरवून फेकावी लागणार आहे. खरा तोच इतिहास दाखवा असे संजय लीला भन्साळीला बजावताना खरा तो इतिहास जाणून घेण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. शिवाय हे केवळ तेवढ्यावरच भागणारे नाही. आपल्यासमोर जो इतिहास पुराव्यांच्या पायावर सध्या उभा आहे तो पचविण्याची कुवत आपल्याला दाखवावी लागणार आहे. अशी ताकद खरोखरच आपल्यात आहे का?


Read more...

निमित्त मस्तानी


मस्तानीबाबत तर तिच्या हयातीतच अनेक कंड्या पिकविण्यात आल्या होत्या. ती राजकन्या. पण तिला वेश्या ठरवले गेले. ती मुस्लिम नव्हे. ती प्रणामी पंथाची. पण तिला मुस्लिम ठरविण्यात आले. तो पेशवाईतील एका मोठ्या कटाचा भाग होता आणि त्यात बाजीरावांच्या मातोश्री, बंधु चिमाजी आप्पा आणि पुत्र नानासाहेब यांचा हात होता. हा कट एवढा किळसवाणा होता, की त्यात मस्तानीचे नानासाहेबांबरोबर म्हणजे तिच्या मुलाबरोबरच प्रेमसंबंध असल्याचे दाखवून तिचा काटा काढण्याचाही प्रयत्न झाला होता. आज हा कट काळाच्या पडद्याआड गेला आहे आणि मस्तानीची कलावंतीण म्हणून प्रतिमा तेवढीच शिल्लक उरली आहे....

Read more...

एक होता आनंदमार्ग...

ही फक्त माहिती आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वीची. आनंदमार्ग नावाच्या एका संघटनेची. या माहितीचा आजच्या कोणत्याही संघटनेशी ताळमेळ जुळला तर कृपया तो योगायोग मानू नये. कारण अशा सर्व संघटना, त्यांचा उदय, विकास, त्यांची कार्यपद्धती स्थूलमानाने सारखीच असते. फरक फक्त तपशीलात असतो. आशय तोच असतो. तो आज समजून घ्यायचा, कारण त्यामुळे या संघटनांचे खरे स्वरूप समजणे सोपे जाईल.


Read more...

गांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर


स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा महात्मा गांधी यांच्या हत्येत अजिबात हात नव्हता, असे ख्यातनाम संशोधक-लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे मत आहे. अंदमानात नुकत्याच झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मोरे यांनी या विषयाला हात घातला होता. त्यांचे म्हणणे असे, की गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर सावरकर हयात नसताना गांधीहत्येची चौकशी करण्यासाठी सरकारने कपूर समितीची नेमणूक केली होती. सावरकरवाद्यांनी सावरकरांच्या सांगण्यावरून गांधींची हत्या केल्याचा उल्लेख या समितीने जाता जाता नमूद केला. मात्र अहवालाच्या दोन खंडांमध्ये या संदर्भातील एकही पुरावा समितीने दिलेला नाही. समितीला असा उल्लेख करण्याचा अधिकार नव्हता. मात्र अहवालातील त्याच परिच्छेदाचा आधार घेऊन सावरकरांच्या विरोधात लिहिले जाते. न्यायालयाने सावरकरांनी निर्दोष मुक्त केले असल्याने गांधीहत्येत त्यांचा हात होता, असे कुणी म्हणत असेल तर त्याबाबत पोलिसांत तक्रार केली पाहिजे. कपूर आयोगाच्या अहवालातील तो परिच्छेदच रद्द करण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. आताचे सरकार किमान सावरकरद्वेषी नाही. त्यामुळे याचा विचार होईल असे वाटते. यासंदर्भात अनुयायांनी पुढाकार घ्यावा.

मोरे यांचा तीव्र आक्षेप आहे तो कपूर आयोगाच्या सावरकरांसंबंधीच्या निष्कर्षांवर. गांधीहत्या अभियोगातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष सुटका केली आहे. (He is found not guilty of the offences as specified in the charge and is acquited…) पण कपूर आयोग म्हणतो की सावरकरांचा कटात हात होता. मोरे म्हणतात तसे म्हणण्याचा आयोगाला अधिकारच नव्हता. शिवाय तसे म्हणण्यायोग्य कोणताही पुरावा न्यायालयाने दिलेला नाही. मग आयोगाने कशावर विसंबून सदरहू निष्कर्ष काढला. हे पाहण्यासाठी हा आयोग कोणत्या परिस्थितीत स्थापन झाला ते समजून घेतले पाहिजे.

गांधीहत्या कटाचा निकाल लागून सुमारे सोळा वर्षे झाली होती. मुळात असा काही कट नव्हताच हे नथुराम गोडसेचे म्हणणे होते. न्यायालयात मात्र पुराव्यानिशी असा कट असल्याचे सिद्ध झाले होते.

Read more...

कोण म्हणतो हे टिळकांना रूचले नसते?

ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला ते जर आता असते आणि अशा प्रकारचा गोंगाटाचा गणेशोत्सव साजरा होताना त्यांनी पाहिले असते तर त्यांनाही हे रूचले नसते. उलट त्यांनीच अशा प्रकारच्या दणदणाटाच्या गणेशोत्सवाला विरोध केला असता.-    मुंबई उच्च न्यायालय, ता. २८ ऑगस्ट २०१५

सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट. उत्सवप्रिय मंडळांचे म्हणणे असे की ही बाब धार्मिक. परंपरेने चालत आलेली. आम्ही याबाबतीत कोणाचेही ऐकणार नाही. उत्सव दणक्यात साजरे होणारच. विरोधी मंडळींचे म्हणणे असे की या उत्सवांनी सर्वसामान्य शहरी नागरिकांना त्रास होतो. तो होता कामा नये. यात प्रश्न गणेशोत्सवाचा आला की लोकमान्य टिळकांची आठवण सर्वांनाच येते. लोकमान्यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणपत्युत्सवास चालना दिली. ते श्रेय त्यांचेच. हा उत्सव सुरू करण्यामागे त्यांची भावना निव्वळ धार्मिक होती असे मात्र नाही. ते स्वतःही काही फार मोठेसे आचारमार्गी नव्हते. तेव्हा हा उत्सव सुरू झाला तो लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढवावी या हेतूने. साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी या उत्सवाला राष्ट्रीय घटना म्हणून गौरविले आहे. तेव्हा एक बाब स्पष्ट व्हावी की हा उत्सव सुरूवातीपासूनच राजकीय स्वरूपाचा आहे. तत्पूर्वी तो होतच होता. राजेरजवाडे वगैरे लोक तो मोठ्या धामधुमीने तो करीत. दहा दहा दिवस तो चाले. त्यासाठी वाडे शृंगारले जात. हत्ती, घोडे लावून मिरवणुका निघत. मंडपांत गाणे-बजावणे, पुराण-कीर्तने, लळीते सोंगे वगैरे प्रकार होत. पण त्यामागील भावना धार्मिक असे. टिळकांनी त्या धार्मिक भावनेला राजकारणाची जोड दिली.

Read more...

राधेमाँचे कुठे काय चुकले?


बहुत ज्ञाती नागवलीं। कामनेने वेडी केली।
कामना इच्छितांच मेलीं। बापुडी मूर्खे।।
अनेक ज्ञानी म्हणविणारे लोक कामनेने वेडे झाल्याने नागविले जातात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न कमावताच मरून जातात.
(दासबोध, ५.२.३७)
००००००००००


काळ बाजारीकरणाचा आहे. या बाजाराचा एक मूलभूत नियम आहे. मागणी आणि पुरवठ्याचा. मागणीनुसार पुरवठा केला जातो. पुरवठा असेल आणि मागणी नसेल, तर ती उत्पन्न केली जाते. त्यासाठी पंधरावी कला - जी जाहिरात – ती पणाला लावली जाते. एकंदर बाजार सुरूच राहील हे पाहिले जाते. हा बाजार कशाचाही असू शकतो. तो धर्माचा असतो. अध्यात्माचा असतो. राधेमाँ हे अशा बाजारातील पुरवठ्याचे प्रकरण असते. राधेमाँ हे बाजारातील एक ब्रँडनेम असते. असे ब्रँड अनेक असतात. गरज आणि ऐपतीनुसार लोक त्या-त्या ब्रँडचा अंगिकार करीत असतात. हे एकदा नीट ध्यानी घेतले की राधेमाँच्या निमित्ताने सध्या जो काही गदारोळ सुरू आहे त्याचा अर्थ लावणे सोपे जाते.

Read more...

हवा भयगंडाची...

ग्लोबल वॉर्मिगच्या चर्चेने आपला जीव घाबरून जातो. पण भरपूर वनसंपदा होती, प्रदूषण नव्हते, रसायनांचा मारा नव्हता अशा प्राचीन काळात महाभयानक दुष्काळ पडायचे असे उल्लेख सापडतात, त्याचे काय?

Read more...

मिथक निर्मितीचा कारखाना


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर पं. जवाहरलाल नेहरू यांचे हेर वीस वर्षे पाळत ठेवून होते असा गौप्यस्फोट कोलकात्यातील पालिका निवडणुकांच्या तोंडावर होणे याला योगायोग म्हणायचे की कसे, हे ज्याने–त्याने आपण कोठे उभे आहोत यावरून ठरवावे. एक गोष्ट मात्र खरी राजकारणात योगायोगासारख्या गोष्टींना थारा नसतो. तेथील कायदे वेगळेच असतात. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेताजींविषयीची निवडक गोपनीय कागदपत्रे माध्यमांत पोचविली जातात, ती नेमकी नेताजींच्या नातेवाईकांवर काँग्रेस सरकार कसे पाळत ठेवत होते याबद्दलची असतात, त्यावरून नेताजी परतले तर आपले काय होणार ही भीती गांधी-नेहरूंच्या मनात कशी होती हे दिसते अशा बातम्या छापल्या जातात आणि नेहरू हा काँग्रेसचा नेता कसा सैतानी मनोवृत्तीचा हलका माणूस होता असा जोरदार प्रचार समाजमाध्यमांतून केला जातो, हे सगळेच कसे योजनाबद्ध आहे. काँग्रेसमुक्त भारत या महान योजनेचा एक छोटासा भाग म्हणूनही याकडे पाहता येईल.
ही योजना तशी जुनीच. मिथक निर्मिती हा तिचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

Read more...

मुस्लिमांपुढील आव्हानजगाचा धार्मिक रंग बदलतो आहेत.
रंगांचा वापर आपण प्रतिकांसारखा करतो. म्हणजे हिंदू म्हटले की भगवा, मुस्लिम हिरवा. तर हा हिरवा रंग भराभर पसरतो आहे. सध्याचे लोकसंख्यावाढीचे प्रमाण असेच राहिले, तर पुढच्या ३५ वर्षांत जगभरातील मुस्लिमांची लोकसंख्या ख्रिश्चनांच्या लोकसंख्येशी बरोबरी करू लागेल. म्हणजे एकविसाव्या शतकाच्या मध्यावर येऊन आपण पाहिले तर जगात मुस्लिमांची लोकसंख्या २८० कोटी असेल. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्के आहे. ख्रिश्चनांची लोकसंख्या २९० कोटी असेल. हे प्रमाण ३१ टक्के आहे. यामुळे तिकडे युरोपात मोठीच उलथापालथ होणार आहे. तेथे दर दहा व्यक्तींमागे एक जण मुस्लिम असेल. आणि अमेरिकेत. तेथेही तसेच. मुस्लिमांचे प्रमाण वाढणार आहे. ज्यूंपेक्षा त्यांची संख्या लक्षणीय असेल. 

आता यात हिंदू धर्म कुठे आला?

Read more...

गांधी नावाचा गुन्हेगार!

  
या ३१ जानेवारीला महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची पुण्यतिथी साजरी करायची की थोर पत्रकार पंडित नथुराम गोडसे यांच्या पुतळ्यांचे अनावरण करायचे हा मोठाच सवाल अनेकांच्या राष्ट्रप्रेमी डोक्यामध्ये पिंगा घालणार यात काही शंकाच नाही. आजवर पं. गोडसे यांची या राष्ट्राने मोठीच अवहेलना केली. त्यांना माथेफिरू म्हटले. पण ते तसे नव्हते हे आता हिंदुस्थानातील किमान ३१ टक्के मतदारांच्या लक्षात येऊ लागले आहे. हे प्रमाण वाढतच जाणार यात शंका नाही. त्यादृष्टीने आपले आदरणीय नेते साक्षी महाराज यांच्यासारखी मंडळी कार्यरत आहेच. त्यांचे कार्य दुहेरी पद्धतीने सुरू आहे. एकीकडे पं. गोडसे यांचे पुतळे उभारून जनजागृती करायची आणि दुसरीकडे आसिंधुसिंधु हिंदुबंधुंची संख्या वाढवत न्यायची. त्याचे दोन उपाय. घर वापसी हा जवळचा आणि हिंदु मातांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती व्हावे यासाठी जागृती करणे हा दूरवरचा उपाय. दरम्यानच्या काळात महात्मा गांधी यांना पुसण्याचे आपले काम आपण सुरूच ठेवू या.

Read more...

आपली प्राचीनातली उड्डाणकला!

आपले पूर्वज थोर होते यात शंकाच नाही. इसवीसन पूर्व दोन हजार ते चौदाशे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. म्हणजे आजपासून साधारणतः चार-साडेचार हजार वर्षांपूर्वी ऋग्वेदासारखे काव्य रचणारे लोक बुद्धिमानच असणार. सिंधु संस्कृती त्याही आधीची. इ.पू. ३२०० ते २६५० हा तिचा काळ आणि त्या काळात त्या लोकांनी नगरे उभारली. तेथे विकास नियंत्रण कायदे होते की काय हे कळायला मार्ग नाही, पण आजच्या आपल्या शहरांहून त्यांची रचना किती तरी पटीने उत्तम होती. अशी दृष्टी, अशी स्थापत्यकला माहित असलेली माणसे मोठीच असणार. त्याच आपल्या पूर्वजांनी पुढे जाऊन उपनिषदांसारखे तत्वज्ञान सांगितले. लोकायतांचे प्रत्यक्षप्रमाण सिद्धांत आपल्या लोकप्रिय धार्मिक तत्वज्ञानाला किती पटतात हा भाग वेगळा, पण आपल्या पूर्वजांनी ज्योतिर्वेद आणि आयुर्वेद यांसारखी शास्त्रे रचली म्हटल्यावर त्यांना विज्ञान संशोधनाचे प्राथमिक नियम नक्कीच ठावूक होते. चरकाने सांगितलेले काढे, आरिष्ट आणि आसवे तर आजही आपण घेतो, पण जगातला पहिला प्लास्टिक सर्जनही आपलाच. सुश्रुत हे त्याचे नाव. साधारणतः इ.पू. ६५० हा त्याचा काळ. याच पूर्वजांनी जगाला बीजगणिताची मूलभूत तत्वे दिली. लाईफ ऑफ पाय हे तर आपल्या पूर्वजांमुळेच शक्य झाले. आर्यभट्टांनी ग्रीकांच्या किती तरी आधी पायची अगदी अचूक किंमत सांगून ठेवली होती. शिवाय जगाला आपण शून्य दिले हे तर आता बालवाडीतील मुलेही सांगू शकतात. एकंदर ही यादी अशी बरीच लांबविता येते. पण अलीकडे काही जणांना ही यादी ताणण्याचा छंद जडला आहे.

Read more...

वस्तुनिष्ठतावादाचा पाया...द फाऊंटनहेड. लेखिका आयन रँड.
डझनभर प्रकाशकांनी हे पुस्तक नाकारलं होतं. एकाने हिंमत दाखवली. प्रकाशित केलं आणि या पुस्तकाने इतिहास घडवला. विकिपेडियावर विश्वास ठेवायचा तर आजवर या पुस्तकाच्या साडेसहा कोटी प्रती खपल्या आहेत. हा झाला अधिकृत प्रतींचा आकडा. पण उच्च नीतिमूल्यांचा संदेश देणा-या या पुस्तकाच्या अनधिकृत प्रतीही कोटींच्या संख्येने विकत गेल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर कधीतरी कुणीतरी या पुस्तकाबद्दल सांगतं. आपण ते मिळवतो. वाचतो आणि त्याच्या प्रेमात पडतो. हे पुस्तक आपल्याला झपाटतं. आजवर मनावर कोरण्यात आलेल्या तत्वविचारांबाबत शंका निर्माण करतं. धार्मिक, अध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच भूमिका तपासून घ्यायला लावतं. हे गेली सात दशकं असंच सुरू आहे. यापुढेही अनेकांच्या विचारांवर ही कादंबरी आणि रँड यांचा ऑब्जेक्टिव्हिजम असाच परिणाम करीत राहील. एवढी परिणामकारक, एवढी नावाजलेली ही कादंबरी. तिच्यावर तेवढ्याच प्रमाणावर टीका झाली आहे, ती तेवढीच धिक्कारली गेली आहे. असं काय आहे या कादंबरीत की अनेकांना तिची भीती वाटते? ज्या कादंबरीने अनेकांना जगण्याची दिशा दिली, तीच अनेकांना लगदा-वाङ्मयाहूनही हीन वाटते? या कादंबरीच्या या यशाचं गमक कशात आहे? हे नेमकं काय रसायन आहे? हे पाहण्यासाठी आधी आपल्याला दुस-या महायुद्धापर्यंत जावं लागेल. 

Read more...

‘आपल्या’ हिंदू धर्मावरील संकट

शिर्डीचे साईबाबा हे परमेश्वर आहेत की नाहीत हा प्रश्नच मुळी हास्यास्पद आहेत. हिंदूंच्या धर्मसंसदेने त्यांना देवत्त्व आणि गुरुपद नाकारले आहे. पण त्याला व्यवहारात खरोखरच काही अर्थ नाही. कारण तो अखेर श्रद्धेचा प्रश्न आहे. कोट्यवधी हिंदू आणि मुस्लिम त्यांना संत, गुरु, भगवान मानतात. त्यामुळे द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांना लुटेरा, वेश्यापुत्र, मांसाहारी म्हटले, त्यांच्या भक्तांना संक्रामक बिमारी झाली आहे अशी टीका केली किंवा शंकराचार्यांच्या नेतृत्त्वाखाली छत्तीसगढमधील कवर्धा येथे झालेल्या धर्मसंसदेने साईबाबांच्या मूर्ती उखडून गंगेत फेकण्याचा आदेश दिला म्हणून काही कोणताही साईभक्त साईबाबांची भक्ती सोडणार नाही. मुस्लिमांबाबत प्रश्नच नाही. त्यांना हा आदेश मानण्याचे बंधनच नाही. पण तसे तर ते हिंदू धर्मियांवरही नाही. तरीही शंकराचार्य वगैरे मंडळींची धर्मसंसद हा आदेश देते. गुजरातेतील बलसाडमधील शिवमंदिरात लगोलग त्याचे पालन केले जाते. त्या आधी उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका मंदिरातून अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते बळजबरीने साईबाबांची मूर्ती हटवतात. गायब करतात. जिल्हा प्रशासन तिचा शोध घेत आहे, तर त्याला विरोध करतात. या सर्व घटनांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. याचे कारण हा केवळ साईबाबांच्या भगवान असण्या-नसण्याशी संबंधीत प्रश्न नाही. तर हिंदू धर्माचे आजवरचे स्वरूप पालटण्याच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक छोटासा परंतु महत्त्वपूर्ण भाग आहे.

Read more...

'रॉ' मटेरियल !

(पडद्यामागचे राजकारण समजावून घेण्यासाठी)


राजकारण हा जगातील एक असा विषय आहे, की त्यात सगळेच तज्ञ असतात. तशात ते राजकीय बातमीदार असतील, तर विषयच संपला! राजकीय नेत्यांशी जवळीक आणि त्यांच्याकडून मिळणारे गॉसिपचे तुकडे एवढ्या आधारावर त्यांची तज्ञता फळते, फुलते. लिहिण्याची झोकदार शैली असली, की ही तज्ञता पाजळताही येते. वाईट असे, की पुढे त्यांना स्वतःलाही वाटू लागते, की आपल्याला राजकारणाच्या गूढगर्भातलेही सारे काही कळते. द कावबॉईज ऑफ रॉसारखी पुस्तके वाचली की मग लक्षात येते, की राजकारण इतके सोपे नसते. एकपदरी नसते. त्याला अनेक पापुद्रे असतात.

प्रत्येक राजकीय घडामोडींमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. भिन्न प्रतलांवरून ते चालत असते. द कावबॉईज ऑफ रॉसारखी पुस्तके हे भान देतात, की उदाहरणार्थ

Read more...

मॅनहंटबिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा!

मॅनहंट
पीटर बर्गन
अनुवाद : रवि आमले

बाजारात 'बेस्टसेलर' ठरलेल्या इंग्रजी किंवा अन्य भाषांतील पुस्तकांचे मराठीत झटपट अनुवाद होतात. 'बेस्टसेलर' पुस्तकांची लोकप्रियता 'कॅश' करण्यासाठी मराठीतील प्रकाशकही घाई करतात. परिणामी, अनेक अनुवादित पुस्तकं ही निव्वळ भाषांतरित किंवा पटकन उरकलेली अशी दिसतात. सुदैवानं 'मॅनहंट'बाबत तसं झालेलं नाही. बर्गन यांनी जितक्या उत्कटतेनं आणि काळजीपूर्वक लादेनच्या शोधाचा प्रवास मांडला, तितक्याच उत्कटतेनं व काळजीनं रवि आमले यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मराठी शब्दांचा आग्रही वापर आणि सुटसुटीत वाक्यरचना हे या अनुवादित पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. त्याखेरीज या पुस्तकाला मूळ पुस्तकासारखा प्रवाहीपणा आलाच नसता. 'मॅनहंट' हे अनुवादित पुस्तक आहे, असं वाटत नाही, इतका अस्सलपणा या अनुवादात उतरला आहे. ओसामा बिन लादेनवर गेल्या दोन-अडीच वर्षांत बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातल्या फारच थोडी अस्सल आणि कष्टपूर्वक केलेल्या संशोधनावर आधारित आहेत. 'मॅनहंट' हे त्या अधिकृत दस्तावेजांपैकीच एक.
- असिफ बागवान 

ऑनलाइन शॉपिंग 

Read more...

विवाहसंस्थेचा (बदलता) इतिहास

संस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर मग सगळा प्रश्नच मिटतो. आपल्याला मग थोर सांस्कृतिक-गुरख्याच्या भूमिकेत जाण्यावाचून गत्यंतरच नसते. आणि एकदा माणूस त्या भूमिकेत गेला, की त्याच्या हाती लाठी, काठी, दंड, दगड यांशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. अशा माणसांची दृष्टी अधू आणि संवादाचे इंद्रिय पंगू झालेले असते. त्यांच्याशी बोलणे होऊच शकत नाही. मात्र इतरांची, म्हणजे तुमच्या-आमच्यासारख्या सर्व सामान्यांची गोष्ट जरा निराळी असते. आपण हे समजून घेऊ शकतो, की संस्कृती हे साचलेले डबके नसते. ती प्रवाही असते. बदल हा तिचा स्थायीभाव असतो आणि सांस्कृतिक नीतिमूल्ये नेहमीच कालसापेक्ष असतात. तिच गोष्ट त्या-त्या संस्कृतीतून जन्मलेल्या सामाजिक संस्थांची. त्यांत कालानुरूप बदल झाले नाही, तर त्या संस्था कोसळतात तरी किंवा कुजतात तरी आणि शिल्लक त्यांची ममीभूत कलेवरेच राहतात. ज्या बदलतात, त्या शतकांचे रस्ते चालूनही सळसळत्या राहतात. उदाहरणार्थ आपली भारतीय विवाहसंस्था.

Read more...

रॉ फाइल

आपल्याकडच्या प्रत्येक दहशतवादी कारवाईमागे इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात असतो, असे म्हणण्याची पद्धत आहे. तशीच रीत पाकिस्तानातही आहे. तेथील प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे रिसर्च अँड अँनालिसिस विंग (रॉ)चा हात आहे, असे म्हटले जाते. तीन वर्षांमागे लाहोरमध्ये अहमदींवर भीषण हल्ला झाला होता. ८० लोक त्यात मारले गेले होते. तर पाकिस्तानमधील द नेशन या इंग्रजी दैनिकात पहिल्या पानावर ती हल्ल्याची बातमी होती आणि शेवटच्या पानावर पाकिस्तानात ३५ हजार रॉ एजंट कार्यरत अशा ठळक मथळ्याची सविस्तर बातमी होती. रॉच्या बाबतीत तिथे हे असे नेहमीच म्हटले जाते. कारण ते सोयीचे असते. कदाचित ते खरेही असेल, पण त्याबद्दल कोण खात्रीपूर्वक सांगणार?

Read more...

रांगडा आणि रुमानी!

नाना पाटेकरांची एक प्रतिमा आहे. रांगडा आणि परखड मनुष्य अशी. ते मोठे अभिनेते आहेतच. पण तिथंही पुन्हा हीच प्रतिमा आहे. तिथं त्याला फक्त एक जोड असते. हळव्या रोमँटिकपणाची. नाना कविता-बिविता म्हणू लागतात, तेव्हा भलतेच उबदार वाटतात. धनगरी घोंगडीसारखे. या प्रतिमांमुळं होतं असं, की नाना आपले वाटता वाटता, त्यांचा दरारा वाटू लागतो. प्रत्यक्ष बाळासाहेबांना चार शब्द सुनावण्याची ऐपत असलेला हा मनुष्य. त्यांच्या फटकळ वाणीचा दरारा वाटणारच.

नानांच्या अंधेरीच्या घरी जाताना त्यामुळे थोडी धाकधूकच होती, की त्यांचा मूड असला तर बरं. रस्त्यात चार ठिकाणी पत्ता विचारत पोचलो, तेव्हा संध्याकाळ झाली होती. इमारतीच्या खालून संपादकांनी त्यांना मोबाईल लावला. त्यांनी खिडकीतून खाली डोकावलं आणि खणखणीत साद दिली – गिरीश...
म्हटलं, व्वा! अंधेरीच्या उच्चभ्रू सोसायटीत अशी वरून जोरात हाक मारणं हे टिपिकलच!

Read more...