या क्षणी मनात फक्त प्रश्नांचं जंजाळ आहे...
का? आम्हीच का? मुंबईच का?
माहीत आहे, की मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तिच्यावर घाव घातला, की तो सर्वांच्याच वर्मी बसतो. पण तरीही का?
म्हणजे घाव घालायला काही कारण तर पाहिजे. नुसतीच दहशत पसरवायची? निरुद्देश? पण हेही माहीत आहे, की उद्देशहीन काहीही नसतं. पण "त्यांना' जे हवंय ते देणं कुणाच्याही हाती नाही. कोणालाच ते शक्य नाही, हे तर लख्ख स्पष्ट आहे; पण तरीही ते जीव खाऊन घाव घालत आहेत.
ते कोण करतं, म्हणजे कोणती संघटना करते, इंडियन मुजाहिदीन की लष्कर-ए-तय्यबा याला खरं तर तसा काहीही अर्थ नाही. दहा तोंडांचा साप. कोणत्या तोंडानं चावला, यानं काय फरक पडतो? सगळे सारखेच आहेत. सगळे एकच आहेत. प्रश्न इतकाच आहे, की त्यांना हवंय तरी काय? फक्त सूड? कुठल्या तरी क्रियेवरची केवळ प्रतिक्रिया? सध्या तरी तसंच दिसत आहे; पण हे सूडचक्र असं किती काळ फिरत राहणार? सृष्टीच्या अंतापर्यंत?
प्रश्न आणि बरेच प्रश्न...
Read more...
नेताजींच्या पुस्तकाचा वाद
-
निवेदन -
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युच्या गुढाबद्दले माझे आकर्षण जुनेच.
किमान १५ वर्षे त्याबद्दल मिळेल ते मी वाचत आहे. अनुज धर यांचे लेख आणि
पुस्...