आपल्याकडच्या प्रत्येक दहशतवादी कारवाईमागे इंटर सर्व्हिस
इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात असतो, असे म्हणण्याची
पद्धत आहे. तशीच रीत पाकिस्तानातही आहे. तेथील प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे
रिसर्च अँड अँनालिसिस विंग (रॉ)चा हात आहे, असे म्हटले जाते. तीन वर्षांमागे
लाहोरमध्ये अहमदींवर भीषण हल्ला झाला होता. ८० लोक त्यात मारले गेले होते. तर
पाकिस्तानमधील ‘द नेशन’ या इंग्रजी दैनिकात पहिल्या पानावर ती हल्ल्याची बातमी होती आणि शेवटच्या
पानावर पाकिस्तानात ३५ हजार रॉ एजंट कार्यरत अशा ठळक मथळ्याची सविस्तर बातमी होती.
रॉच्या बाबतीत तिथे हे असे नेहमीच म्हटले जाते. कारण ते सोयीचे असते. कदाचित ते खरेही
असेल, पण त्याबद्दल कोण खात्रीपूर्वक सांगणार?
या ब्लॉगवरचे लेख या पूर्वी कोठे ना कोठे प्रसिद्ध झाले आहेत. बहुतेक लेख सकाळमधले वा लोकसत्तातले आहेत. आता हे वृत्तपत्रीय लिखाण म्हणजे अगदीच प्रासंगिक असते, तेव्हा ते येथे पुन्हा देण्याचे कारण काय?
एक तर हौस! आणि दुसरे म्हणजे, ते लेख प्रसंगोपात लिहिले असले, तरी ते प्रासंगिक नाहीत, असे मला वाटते. कारण की त्यात मला जे म्हणायचे आहे, ते आजही तितकेच ताजे आहे.
त्यांचे असत्याचे प्रयोग!
-
गांधींविषयी गैरसमज पसरविणा-या, त्यांचे चारित्र्यहनन करणा-या अशा अनेक गोष्टी
पसरविल्या जात आहेत. त्यांची बनावट चित्रे तयार करून ती प्रसारित केली जात
आहेत...
नेताजींच्या पुस्तकाचा वाद
-
निवेदन -
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युच्या गुढाबद्दले माझे आकर्षण जुनेच.
किमान १५ वर्षे त्याबद्दल मिळेल ते मी वाचत आहे. अनुज धर यांचे लेख आणि
पुस...
मिशेल नावाचा ‘चॉपर’
-
गेल्या मार्चमधील ही बातमी. गोव्याच्या किनारपट्टीपासून आत समुद्रात एका
छोट्याशा बोटीवर अडकलेल्या एक महिलेची तटरक्षक दलाच्या बोटींनी सुटका केली. ती
होती सं...
तुका लोकी निराळा
-
*संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला *
*यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.*
*तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आण...