या ३१ जानेवारीला महात्मा मोहनदास करमचंद गांधी
यांची पुण्यतिथी साजरी करायची की थोर पत्रकार पंडित नथुराम गोडसे यांच्या
पुतळ्यांचे अनावरण करायचे हा मोठाच सवाल अनेकांच्या राष्ट्रप्रेमी डोक्यामध्ये
पिंगा घालणार यात काही शंकाच नाही. आजवर पं. गोडसे यांची या राष्ट्राने मोठीच
अवहेलना केली. त्यांना माथेफिरू म्हटले. पण ते तसे नव्हते हे आता हिंदुस्थानातील
किमान ३१ टक्के मतदारांच्या लक्षात येऊ लागले आहे. हे प्रमाण वाढतच जाणार यात शंका
नाही. त्यादृष्टीने आपले आदरणीय नेते साक्षी महाराज यांच्यासारखी मंडळी कार्यरत
आहेच. त्यांचे कार्य दुहेरी पद्धतीने सुरू आहे. एकीकडे पं. गोडसे यांचे पुतळे
उभारून जनजागृती करायची आणि दुसरीकडे आसिंधुसिंधु हिंदुबंधुंची संख्या वाढवत
न्यायची. त्याचे दोन उपाय. घर वापसी हा जवळचा आणि हिंदु मातांनी अष्टपुत्रा
सौभाग्यवती व्हावे यासाठी जागृती करणे हा दूरवरचा उपाय. दरम्यानच्या काळात महात्मा
गांधी यांना पुसण्याचे आपले काम आपण सुरूच ठेवू या.
Read more...