'रॉ' मटेरियल !

(पडद्यामागचे राजकारण समजावून घेण्यासाठी)


राजकारण हा जगातील एक असा विषय आहे, की त्यात सगळेच तज्ञ असतात. तशात ते राजकीय बातमीदार असतील, तर विषयच संपला! राजकीय नेत्यांशी जवळीक आणि त्यांच्याकडून मिळणारे गॉसिपचे तुकडे एवढ्या आधारावर त्यांची तज्ञता फळते, फुलते. लिहिण्याची झोकदार शैली असली, की ही तज्ञता पाजळताही येते. वाईट असे, की पुढे त्यांना स्वतःलाही वाटू लागते, की आपल्याला राजकारणाच्या गूढगर्भातलेही सारे काही कळते. द कावबॉईज ऑफ रॉसारखी पुस्तके वाचली की मग लक्षात येते, की राजकारण इतके सोपे नसते. एकपदरी नसते. त्याला अनेक पापुद्रे असतात.

प्रत्येक राजकीय घडामोडींमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. भिन्न प्रतलांवरून ते चालत असते. द कावबॉईज ऑफ रॉसारखी पुस्तके हे भान देतात, की उदाहरणार्थ

Read more...

मॅनहंट



बिन लादेनच्या शोधाची थरारक सत्यकथा!

मॅनहंट
पीटर बर्गन
अनुवाद : रवि आमले

बाजारात 'बेस्टसेलर' ठरलेल्या इंग्रजी किंवा अन्य भाषांतील पुस्तकांचे मराठीत झटपट अनुवाद होतात. 'बेस्टसेलर' पुस्तकांची लोकप्रियता 'कॅश' करण्यासाठी मराठीतील प्रकाशकही घाई करतात. परिणामी, अनेक अनुवादित पुस्तकं ही निव्वळ भाषांतरित किंवा पटकन उरकलेली अशी दिसतात. सुदैवानं 'मॅनहंट'बाबत तसं झालेलं नाही. बर्गन यांनी जितक्या उत्कटतेनं आणि काळजीपूर्वक लादेनच्या शोधाचा प्रवास मांडला, तितक्याच उत्कटतेनं व काळजीनं रवि आमले यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. मराठी शब्दांचा आग्रही वापर आणि सुटसुटीत वाक्यरचना हे या अनुवादित पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. त्याखेरीज या पुस्तकाला मूळ पुस्तकासारखा प्रवाहीपणा आलाच नसता. 'मॅनहंट' हे अनुवादित पुस्तक आहे, असं वाटत नाही, इतका अस्सलपणा या अनुवादात उतरला आहे. ओसामा बिन लादेनवर गेल्या दोन-अडीच वर्षांत बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातल्या फारच थोडी अस्सल आणि कष्टपूर्वक केलेल्या संशोधनावर आधारित आहेत. 'मॅनहंट' हे त्या अधिकृत दस्तावेजांपैकीच एक.
- असिफ बागवान 





ऑनलाइन शॉपिंग 

Read more...

विवाहसंस्थेचा (बदलता) इतिहास

संस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर मग सगळा प्रश्नच मिटतो. आपल्याला मग थोर सांस्कृतिक-गुरख्याच्या भूमिकेत जाण्यावाचून गत्यंतरच नसते. आणि एकदा माणूस त्या भूमिकेत गेला, की त्याच्या हाती लाठी, काठी, दंड, दगड यांशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. अशा माणसांची दृष्टी अधू आणि संवादाचे इंद्रिय पंगू झालेले असते. त्यांच्याशी बोलणे होऊच शकत नाही. मात्र इतरांची, म्हणजे तुमच्या-आमच्यासारख्या सर्व सामान्यांची गोष्ट जरा निराळी असते. आपण हे समजून घेऊ शकतो, की संस्कृती हे साचलेले डबके नसते. ती प्रवाही असते. बदल हा तिचा स्थायीभाव असतो आणि सांस्कृतिक नीतिमूल्ये नेहमीच कालसापेक्ष असतात. तिच गोष्ट त्या-त्या संस्कृतीतून जन्मलेल्या सामाजिक संस्थांची. त्यांत कालानुरूप बदल झाले नाही, तर त्या संस्था कोसळतात तरी किंवा कुजतात तरी आणि शिल्लक त्यांची ममीभूत कलेवरेच राहतात. ज्या बदलतात, त्या शतकांचे रस्ते चालूनही सळसळत्या राहतात. उदाहरणार्थ आपली भारतीय विवाहसंस्था.

Read more...