hindu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
hindu लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संतांची फॅक्टरी


Populus vult decipi – ergo decipiatur.t 
(लोकांना स्वत:ला फसवून घ्यायचे असते, म्हणून ते फसले जातात. एक लॅटिन वचन.) 

कोणत्याही राष्ट्राला जगण्यासाठी उद्योगधंदे वगैरे उभारावेच लागतात. व्हॅटिकन हे जगातील सर्वात लहान राष्ट्र. तेथे असे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे बहुधा त्यांनी तेथे संतांचे कारखाने काढले आहेत. धर्म हे सार्वकालीन चलनी नाणे आहेच. त्यात हे उत्पादन. या जोरावर व्हॅटिकनचा जागतिक संसार छान चालतो. अलीकडच्या काळात व्हॅटिकनचा हा संतनिर्मितीचा उद्योग चांगलाच वाढल्याचा दिसतो. आकडेवारीत सांगायचे, तर १९७८ ला पोपपदी आलेल्या जॉन पॉल दुसरे यांनी तब्बल ४८२ जणांना संतपद बहाल केले. सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी तो विक्रम मोडण्याचा चंग बांधल्याचे दिसते. त्यांनी आल्या आल्या ८१३ जणांना घाऊकपणे संतपदी नेऊन बसविले आणि आता भारतरत्न मदर तेरेसा यांचा संतपदाचा मार्ग मोकळा केला आहे.

Read more...

एक होता आनंदमार्ग...

ही फक्त माहिती आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वीची. आनंदमार्ग नावाच्या एका संघटनेची. या माहितीचा आजच्या कोणत्याही संघटनेशी ताळमेळ जुळला तर कृपया तो योगायोग मानू नये. कारण अशा सर्व संघटना, त्यांचा उदय, विकास, त्यांची कार्यपद्धती स्थूलमानाने सारखीच असते. फरक फक्त तपशीलात असतो. आशय तोच असतो. तो आज समजून घ्यायचा, कारण त्यामुळे या संघटनांचे खरे स्वरूप समजणे सोपे जाईल.


Read more...

गांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर


स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा महात्मा गांधी यांच्या हत्येत अजिबात हात नव्हता, असे ख्यातनाम संशोधक-लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे मत आहे. अंदमानात नुकत्याच झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मोरे यांनी या विषयाला हात घातला होता. त्यांचे म्हणणे असे, की गांधी हत्येच्या आरोपातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर सावरकर हयात नसताना गांधीहत्येची चौकशी करण्यासाठी सरकारने कपूर समितीची नेमणूक केली होती. सावरकरवाद्यांनी सावरकरांच्या सांगण्यावरून गांधींची हत्या केल्याचा उल्लेख या समितीने जाता जाता नमूद केला. मात्र अहवालाच्या दोन खंडांमध्ये या संदर्भातील एकही पुरावा समितीने दिलेला नाही. समितीला असा उल्लेख करण्याचा अधिकार नव्हता. मात्र अहवालातील त्याच परिच्छेदाचा आधार घेऊन सावरकरांच्या विरोधात लिहिले जाते. न्यायालयाने सावरकरांनी निर्दोष मुक्त केले असल्याने गांधीहत्येत त्यांचा हात होता, असे कुणी म्हणत असेल तर त्याबाबत पोलिसांत तक्रार केली पाहिजे. कपूर आयोगाच्या अहवालातील तो परिच्छेदच रद्द करण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. आताचे सरकार किमान सावरकरद्वेषी नाही. त्यामुळे याचा विचार होईल असे वाटते. यासंदर्भात अनुयायांनी पुढाकार घ्यावा.

मोरे यांचा तीव्र आक्षेप आहे तो कपूर आयोगाच्या सावरकरांसंबंधीच्या निष्कर्षांवर. गांधीहत्या अभियोगातून न्यायालयाने सावरकरांची निर्दोष सुटका केली आहे. (He is found not guilty of the offences as specified in the charge and is acquited…) पण कपूर आयोग म्हणतो की सावरकरांचा कटात हात होता. मोरे म्हणतात तसे म्हणण्याचा आयोगाला अधिकारच नव्हता. शिवाय तसे म्हणण्यायोग्य कोणताही पुरावा न्यायालयाने दिलेला नाही. मग आयोगाने कशावर विसंबून सदरहू निष्कर्ष काढला. हे पाहण्यासाठी हा आयोग कोणत्या परिस्थितीत स्थापन झाला ते समजून घेतले पाहिजे.

गांधीहत्या कटाचा निकाल लागून सुमारे सोळा वर्षे झाली होती. मुळात असा काही कट नव्हताच हे नथुराम गोडसेचे म्हणणे होते. न्यायालयात मात्र पुराव्यानिशी असा कट असल्याचे सिद्ध झाले होते.

Read more...

कोण म्हणतो हे टिळकांना रूचले नसते?

ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला ते जर आता असते आणि अशा प्रकारचा गोंगाटाचा गणेशोत्सव साजरा होताना त्यांनी पाहिले असते तर त्यांनाही हे रूचले नसते. उलट त्यांनीच अशा प्रकारच्या दणदणाटाच्या गणेशोत्सवाला विरोध केला असता.-    मुंबई उच्च न्यायालय, ता. २८ ऑगस्ट २०१५

सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट. उत्सवप्रिय मंडळांचे म्हणणे असे की ही बाब धार्मिक. परंपरेने चालत आलेली. आम्ही याबाबतीत कोणाचेही ऐकणार नाही. उत्सव दणक्यात साजरे होणारच. विरोधी मंडळींचे म्हणणे असे की या उत्सवांनी सर्वसामान्य शहरी नागरिकांना त्रास होतो. तो होता कामा नये. यात प्रश्न गणेशोत्सवाचा आला की लोकमान्य टिळकांची आठवण सर्वांनाच येते. लोकमान्यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणपत्युत्सवास चालना दिली. ते श्रेय त्यांचेच. हा उत्सव सुरू करण्यामागे त्यांची भावना निव्वळ धार्मिक होती असे मात्र नाही. ते स्वतःही काही फार मोठेसे आचारमार्गी नव्हते. तेव्हा हा उत्सव सुरू झाला तो लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढवावी या हेतूने. साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी या उत्सवाला राष्ट्रीय घटना म्हणून गौरविले आहे. तेव्हा एक बाब स्पष्ट व्हावी की हा उत्सव सुरूवातीपासूनच राजकीय स्वरूपाचा आहे. तत्पूर्वी तो होतच होता. राजेरजवाडे वगैरे लोक तो मोठ्या धामधुमीने तो करीत. दहा दहा दिवस तो चाले. त्यासाठी वाडे शृंगारले जात. हत्ती, घोडे लावून मिरवणुका निघत. मंडपांत गाणे-बजावणे, पुराण-कीर्तने, लळीते सोंगे वगैरे प्रकार होत. पण त्यामागील भावना धार्मिक असे. टिळकांनी त्या धार्मिक भावनेला राजकारणाची जोड दिली.

Read more...

राधेमाँचे कुठे काय चुकले?


बहुत ज्ञाती नागवलीं। कामनेने वेडी केली।
कामना इच्छितांच मेलीं। बापुडी मूर्खे।।
अनेक ज्ञानी म्हणविणारे लोक कामनेने वेडे झाल्याने नागविले जातात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न कमावताच मरून जातात.
(दासबोध, ५.२.३७)
००००००००००


काळ बाजारीकरणाचा आहे. या बाजाराचा एक मूलभूत नियम आहे. मागणी आणि पुरवठ्याचा. मागणीनुसार पुरवठा केला जातो. पुरवठा असेल आणि मागणी नसेल, तर ती उत्पन्न केली जाते. त्यासाठी पंधरावी कला - जी जाहिरात – ती पणाला लावली जाते. एकंदर बाजार सुरूच राहील हे पाहिले जाते. हा बाजार कशाचाही असू शकतो. तो धर्माचा असतो. अध्यात्माचा असतो. राधेमाँ हे अशा बाजारातील पुरवठ्याचे प्रकरण असते. राधेमाँ हे बाजारातील एक ब्रँडनेम असते. असे ब्रँड अनेक असतात. गरज आणि ऐपतीनुसार लोक त्या-त्या ब्रँडचा अंगिकार करीत असतात. हे एकदा नीट ध्यानी घेतले की राधेमाँच्या निमित्ताने सध्या जो काही गदारोळ सुरू आहे त्याचा अर्थ लावणे सोपे जाते.

Read more...

मुस्लिमांपुढील आव्हान



जगाचा धार्मिक रंग बदलतो आहेत.
रंगांचा वापर आपण प्रतिकांसारखा करतो. म्हणजे हिंदू म्हटले की भगवा, मुस्लिम हिरवा. तर हा हिरवा रंग भराभर पसरतो आहे. सध्याचे लोकसंख्यावाढीचे प्रमाण असेच राहिले, तर पुढच्या ३५ वर्षांत जगभरातील मुस्लिमांची लोकसंख्या ख्रिश्चनांच्या लोकसंख्येशी बरोबरी करू लागेल. म्हणजे एकविसाव्या शतकाच्या मध्यावर येऊन आपण पाहिले तर जगात मुस्लिमांची लोकसंख्या २८० कोटी असेल. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्के आहे. ख्रिश्चनांची लोकसंख्या २९० कोटी असेल. हे प्रमाण ३१ टक्के आहे. यामुळे तिकडे युरोपात मोठीच उलथापालथ होणार आहे. तेथे दर दहा व्यक्तींमागे एक जण मुस्लिम असेल. आणि अमेरिकेत. तेथेही तसेच. मुस्लिमांचे प्रमाण वाढणार आहे. ज्यूंपेक्षा त्यांची संख्या लक्षणीय असेल. 

आता यात हिंदू धर्म कुठे आला?

Read more...

विवाहसंस्थेचा (बदलता) इतिहास

संस्कृती म्हणजे काचेचे भांडे. बाईच्या इज्जतीप्रमाणे तिला एकदा तडा गेला की गेलाच. तो परत सांधता येत नाही. असे जर आपले विचारऐश्वर्य असेल, तर मग सगळा प्रश्नच मिटतो. आपल्याला मग थोर सांस्कृतिक-गुरख्याच्या भूमिकेत जाण्यावाचून गत्यंतरच नसते. आणि एकदा माणूस त्या भूमिकेत गेला, की त्याच्या हाती लाठी, काठी, दंड, दगड यांशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. अशा माणसांची दृष्टी अधू आणि संवादाचे इंद्रिय पंगू झालेले असते. त्यांच्याशी बोलणे होऊच शकत नाही. मात्र इतरांची, म्हणजे तुमच्या-आमच्यासारख्या सर्व सामान्यांची गोष्ट जरा निराळी असते. आपण हे समजून घेऊ शकतो, की संस्कृती हे साचलेले डबके नसते. ती प्रवाही असते. बदल हा तिचा स्थायीभाव असतो आणि सांस्कृतिक नीतिमूल्ये नेहमीच कालसापेक्ष असतात. तिच गोष्ट त्या-त्या संस्कृतीतून जन्मलेल्या सामाजिक संस्थांची. त्यांत कालानुरूप बदल झाले नाही, तर त्या संस्था कोसळतात तरी किंवा कुजतात तरी आणि शिल्लक त्यांची ममीभूत कलेवरेच राहतात. ज्या बदलतात, त्या शतकांचे रस्ते चालूनही सळसळत्या राहतात. उदाहरणार्थ आपली भारतीय विवाहसंस्था.

Read more...