dharm sansad लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
dharm sansad लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

राधेमाँचे कुठे काय चुकले?


बहुत ज्ञाती नागवलीं। कामनेने वेडी केली।
कामना इच्छितांच मेलीं। बापुडी मूर्खे।।
अनेक ज्ञानी म्हणविणारे लोक कामनेने वेडे झाल्याने नागविले जातात. त्यांना आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न कमावताच मरून जातात.
(दासबोध, ५.२.३७)
००००००००००


काळ बाजारीकरणाचा आहे. या बाजाराचा एक मूलभूत नियम आहे. मागणी आणि पुरवठ्याचा. मागणीनुसार पुरवठा केला जातो. पुरवठा असेल आणि मागणी नसेल, तर ती उत्पन्न केली जाते. त्यासाठी पंधरावी कला - जी जाहिरात – ती पणाला लावली जाते. एकंदर बाजार सुरूच राहील हे पाहिले जाते. हा बाजार कशाचाही असू शकतो. तो धर्माचा असतो. अध्यात्माचा असतो. राधेमाँ हे अशा बाजारातील पुरवठ्याचे प्रकरण असते. राधेमाँ हे बाजारातील एक ब्रँडनेम असते. असे ब्रँड अनेक असतात. गरज आणि ऐपतीनुसार लोक त्या-त्या ब्रँडचा अंगिकार करीत असतात. हे एकदा नीट ध्यानी घेतले की राधेमाँच्या निमित्ताने सध्या जो काही गदारोळ सुरू आहे त्याचा अर्थ लावणे सोपे जाते.

Read more...

‘आपल्या’ हिंदू धर्मावरील संकट

शिर्डीचे साईबाबा हे परमेश्वर आहेत की नाहीत हा प्रश्नच मुळी हास्यास्पद आहेत. हिंदूंच्या धर्मसंसदेने त्यांना देवत्त्व आणि गुरुपद नाकारले आहे. पण त्याला व्यवहारात खरोखरच काही अर्थ नाही. कारण तो अखेर श्रद्धेचा प्रश्न आहे. कोट्यवधी हिंदू आणि मुस्लिम त्यांना संत, गुरु, भगवान मानतात. त्यामुळे द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांना लुटेरा, वेश्यापुत्र, मांसाहारी म्हटले, त्यांच्या भक्तांना ‘संक्रामक बिमारी’ झाली आहे अशी टीका केली किंवा शंकराचार्यांच्या नेतृत्त्वाखाली छत्तीसगढमधील कवर्धा येथे झालेल्या धर्मसंसदेने साईबाबांच्या मूर्ती उखडून गंगेत फेकण्याचा आदेश दिला म्हणून काही कोणताही साईभक्त साईबाबांची भक्ती सोडणार नाही. मुस्लिमांबाबत प्रश्नच नाही. त्यांना हा आदेश मानण्याचे बंधनच नाही. पण तसे तर ते हिंदू धर्मियांवरही नाही. तरीही शंकराचार्य वगैरे मंडळींची धर्मसंसद हा आदेश देते. गुजरातेतील बलसाडमधील शिवमंदिरात लगोलग त्याचे पालन केले जाते. त्या आधी उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका मंदिरातून अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते बळजबरीने साईबाबांची मूर्ती हटवतात. गायब करतात. जिल्हा प्रशासन तिचा शोध घेत आहे, तर त्याला विरोध करतात. या सर्व घटनांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. याचे कारण हा केवळ साईबाबांच्या भगवान असण्या-नसण्याशी संबंधीत प्रश्न नाही. तर हिंदू धर्माचे आजवरचे स्वरूप पालटण्याच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक छोटासा परंतु महत्त्वपूर्ण भाग आहे.

Read more...