संप, बंद, मोर्चे, निदर्शने, धरणे, उपोषण हे आंदोलनाचे काही प्रकार. ही आंदोलने सहसा केली जातात अन्यायाविरोधात. काही मागण्यांसाठी. काही बदल घडवून आणण्यासाठी. त्या मागण्या कायदेशीरदृष्ट्या योग्य की अयोग्य, तो अन्याय खरा की काल्पनिक वगैरे भाग वेगळा. त्या चर्चेत न शिरता केवळ ‘आंदोलन’ आणि तेही प्रस्थापित व्यवस्था वा सरकार यांविरोधात केलेले आंदोलन याचा विचार केला, तर एक बाब लक्षात येते. ती म्हणजे आंदोलन कुणाचेही असो, ते पुकारणाऱ्यांकडे, त्यात सहभागी होणाऱ्यांकडे, ते संपकरी, ते मोर्चेकरी, ते उपोषण करणारे, निदर्शक यांच्याकडे अन्य समाज ज्या दृष्टीने पाहतो, ती दृष्टी मोठ्या प्रयत्नाने खास कमावून देण्यात आलेली आहे. त्याचे एक साधेसे उदाहरण म्हणून महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी झालेल्या आणि गाजलेल्या एका मोठ्या संपाकडे पाहता येईल.
Read more...